Saturday, 9 June 2018

कांदे पोहे


चेहऱ्या वर मिशी येत आहे तोपर्येंत आजू  बाजूच्यांचं विचारणं सुरु होत  काय विचार केला आहे आयुष्या  बद्दल, काय व्हायच आहे, लग्ना चा काय – love कि arranged, काय मुलगी वगैरे बघून ठेवली आहे का?  engineer किंवा doctor म्हणजे काय, हे कदाचित माहीत नसलेल्या मुला-मुलींच्या मनात लग्नाची संकल्पना  मात्र  एकदम घर करून बसलेली असते. काही जण आपला जोडीदार निवडून, किंवा बोली भाषेत, पटवून बसलेले असतात, पण काही भोळे भाबडे सभ्यजण, ज्यांना निवडणं, किंवा बोली भाषेत पटवणं जमत नाही ते बहुतेक वेळा  कांदे पोहे’, ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतातच. तर, हा लेख अश्या कांदा पोहेकार्यक्रमा वर  आहे

      हिंदुस्तान पाकिस्तान च्या  cricket series ला जसा सरकार चा विरोध असतो, तसाच  हा कार्यक्रम  सुरु  करायला एखाद्या मुला मुली च्या मनात विरोध असतो... लग्नाच वय झाल आहे का, वेळ आली आहे का, मी लग्न ला  तयार आहे का, वगैरे वगैरे.. काही ना काही कारणास्तव, जसा सरकार cricket series ला तयार होते, तसाच  कांदा पोहे च्या कार्यक्रमा ला होकार येतो.. मग काय, जय्यत तयारीची सुरुवात ...

      "मौका मौका" ह्या जाहिरात मालिकेची रंगात जीवनात येते. Bio-data तयार करण्यात येतो, चष्मा चालेल कि नाही, नौकरी पाहिजे कि नाही, गोरी-काळी-सावळी कशी पाहिजे, जाड-हडकुळा नको.. अशे अनेक पैलूंवर विचार  विमर्श होतो.. ही match च्या आधी ची net practice .. त्याच काळात स्टेडियम, म्हणजे कांदा पोहे चा ठिकाण ठरवण्यात येत. Home advantage कुणाचं, कि neutral location (म्हणजे एखाद्या हॉटेल) वर कार्यक्रम करायचा ... धाव पट्टी चा तास अंदाज बांधणं अवगढच.. spin-friendly कि swing-friendly कि unplayable conditions असतील काही सांगता येणं कठीण ...

अश्या वातावरण निर्मिती च्या पार्श्वभूमीतून 'कांदा पोहे' चा दिवस उजाडतो ... 'गढ आला पण सिंह गेला' ह्या ध्येया ने match अर्थातच 'कांदा पोहे' च्या कार्यक्रमाची सुरुवात होते. 'तुमच्या आवडी काय आहेत' ह्या काहीश्या ठरलेल्या पहिल्या चेंडू वर तुम्ही जर षटकार ठोकू शकलात तरच सामान्या ला रंगत येऊ शकते ... आणि 'तुमचा अफफैर होत का' ह्या यॉर्कर वर clean bowled  न होण्यात जे कसब तुम्हास पणाला लावावे लागेल ते वाखडण्या जोगच बरं का.. 'दारू सिगारेट' ची काही सवय असल्यास तुमचा ह्या बाउन्सर ने दात पडणे हे निश्चित .. त्यात गुगली, म्हणजे 'तुम्ही मला कस खुश ठेवाल', पडला कि समजा तुम्ही catch out हे नक्की ...
     
'कांदे पोहे' च्या जगदोजहद नंतर गढ सर केल्याचा भावनांना फारस महत्व न देणं हेच खर शहाणपण ... कारण 'Picture अभी बाकी है मेरे दोस्त'. Series ची पुढची match scheduled असते आणि त्याची तयारी अजून भक्कम रित्या कशी करायची हे जीवनाचं एकमेव धोरण होऊन बसत ... Post Match analysis मध्ये वेगवेगळे पैलू आणि तर्क पुढे येतात ... काही ball tampering तर नाही झाली न Match मध्ये ... काही Match-fixing चा वंगाळ तर नाही होत न .. ह्या प्रश्नाच्या उत्तर मध्ये आपण असं cover drive मारायला पाहिजे होत का .. हे सगळं होस तोपर्यंत पुढच्या Match ची वेळ आलेली असते .. आणि आपण पुन्हा man of the match होयच्या तयारी ने कंबर कसून पुढच्या Match साठी घोड्या वर स्वार होतो ...
     
बर्याच 'कांदे पोहे' च्या कार्यक्रमा नंतर, पसंता पसंती झाल्या वर, लग्नाचं बस्तर बसल्या वर, मुलं बाळ झाल्या वर राहतात त्या फक्त आठवणी, गोड़ आठवणी .. त्या पहिल्या कांदा पोहेच्या आणि नक्कीच शेवटच्या कांदा पोहेच्या .. हलकं स, सुस्मित हसू देऊन जाणाऱ्या.. आपल्या यौवनाच्या पदार्पण समारंभाच्या ....

No comments:

Post a Comment